भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सुपर एट फेरीतील सामन्यात भारताने धावांचा डोंगर रचला. टीम इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी धावसंख्या उभारली. भारताने २० षटकांत चार बाद २५६ धावा केल्या. भारताच्या सहा फलंदाजांनी मिळून तब्बल १७ षटकार मारले. विशेष म्हणजे भारताच्या प्रत्येक फलंदाजाने आज १५० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा काढल्या आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील एका सामन्यातील एका डावातल्या सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत भारताने विक्रम नोंदवला.


भारताकडून संजू सॅमसनने १५ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत २४ धावा केल्या. अभिषेक शर्माने ३० चेंडूत प्रत्येकी ४ षटकार आणि ४ चौकार मारत ५५ धावा केल्या. ईशान किशनने २४ चेंडूत ३८ धावा करताना १ षटकार आणि ४ चौकार मारले. कर्णधार सूर्यकुमार यादवने १३ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकार मारत ३३ धावा केल्या. हार्दिक पांड्याने २३ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकार मारत नाबाद ५० धावा केल्या तर तिलक वर्माने १६ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकार मारत नाबाद ४४ धावा केल्या. हार्दिक आणि तिलकने ३१ चेंडूत १६.२५ च्या रनरेटने ८४ धावांची नाबाद भागीदारी केली. झिम्बाब्वेने टाकलेल्या एवढ्या चेंडूंपैकी फक्त २६ चेंडू निर्धाव होते उर्वरित प्रत्येक चेंडूवर भारताने किमान एक धाव काढली होती.


सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. सूर्याने आतापर्यंत १४८ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या १४० डावांत ३४.१ च्या सरासरीने ४०२४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर चार शतके आणि २९ अर्धशतके आहेत.

Comments
Add Comment

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील