दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा सामना दक्षिण आफ्रिकेने नऊ विकेट राखून जिंकला. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचे सेमी फायनलच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल पडले आहे. वेस्ट इंडिजच्या सेमी फायनल खेळण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत. भारताची सेमी फायनल खेळण्याची आशा जिवंत राहिली आहे.


सुपर ८ मध्ये सुरुवातीला झिम्बाब्वे विरुद्धचा सामना १०७ धावांनी तर दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्धचा सामना ७६ धावांनी जिंकला आहे. यामुळे वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला तरच भारताची सेमी फायनल खेळण्याची आशा जिवंत राहणार होती. आता टीम इंडियाला झिम्बाब्वे विरुद्धचा सामना जिंकल्यास रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवत सेमी फायनल गाठणे शक्य होणार आहे.


वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने २० षटकांत आठ बाद १७६ धावा केल्या तर दक्षिण आफ्रिकेने १६.१ षटकांत एक बाद १७७ धावा करून सामना ९ विकेट राखून आरामात जिंकला. दक्षिण आफ्रिकेने २३ चेंडू आणि ९ विकेट राखून वेस्ट इंडिज विरुद्ध विजय मिळवला. या विजयामुळे सुपर ८ फेरीत चार गुण आणि दोन विजयांसह दक्षिण ग्रुप एकमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्यांची धावगती +२,८९० आहे. भारताने झिम्बाब्वे विरुद्धचा सामना जिंकल्यास दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी पात्र होणार आहे.


दक्षिण आफ्रिकेने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन वेस्ट इंडिजला २०० चा टप्पा ओलांडू दिला नाही. कागिसो रबाडा आणि लुंगी न्गिडीने वेस्ट इंडिजला हुशारीने सापळ्यात अडकवले. याउलट वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला आळा घालणे जमले नाही. दक्षिण आफ्रिकेने सर्वांगीण खेळ कायम राखत टी२० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजवर ९ विकेटनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनल फेरीतले स्थान जवळपास पक्कं केलं आहे.


गुरुवारी वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने एकच विकेट गमावत १६.१ षटकात पूर्ण केला. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार एडेन मार्करमने अर्धशतकी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्करम आणि क्विंटन डी कॉक यांनी आक्रमक सुरुवात केली होती. डी कॉकने स्फोटक फलंदाजी करताना मार्करमसोबत पहिल्या विकेटसाठी ८ षटकातच ९५ धावांची भागीदारी केली. ८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डी कॉकला रोस्टन चेसने जेसन होल्डरच्या हातून झेलबाद केले. डी कॉकने २४ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४७ धावांची खेळी केली. त्यानंतरही रायन रिकल्टनने कर्णधाराची दमदार साथ देत संघाला विजयापर्यंत पोहचवले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं या दोन्ही आघाड्यांवर अपयश आलं. एडन मारक्रमलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.


आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र त्यांच्या गोलंदाजांनी अत्यंत शिस्तबद्ध मारा करत वेस्ट इंडिजच्या ताकदवान फटकेबाजांना रोखलं. कर्णधार शे होपने चांगली सुरुवात केली होती. मात्र कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना सापळ्यात रचलं. शिमोरन हेटमायरला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले. मात्र तो त्याच षटकात तंबूत परतला.


टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीतील अत्यंत महत्त्वाच्या लढतीत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आपल्या जिद्दीचे दर्शन घडवले. दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्यामुळे ७१ धावांवर ६ गडी गमावलेल्या वेस्ट इंडिजने जेसन होल्डर आणि रोमॅरियो शेफर्ड यांच्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’च्या जोरावर २० षटकांत ८ बाद १७६ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली.


नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात एखाद्या दुस्वप्नासारखी झाली. सलामीवीर शाई होप (१६) आणि आक्रमक ब्रँडन किंग (२१) स्वस्तात बाद झाले. पाठोपाठ शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि रोस्टन चेस हे तंबूत परतल्याने विंडीजचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळणार असे वाटत होते. आफ्रिकेच्या लुंगी एनगिडी आणि कागिसो रबाडा यांनी विंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते.


जेव्हा विंडीजची अवस्था ६ बाद ७१ अशी बिकट होती, तेव्हा अनुभवी जेसन होल्डर मैदानात उतरला. त्याने केवळ बचाव न करता आफ्रिकेच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. होल्डरने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला रोमॅरियो शेफर्डने मोलाची साथ दिली. शेफर्डने २३ चेंडूत नाबाद ३७ धावा फटकावत धावगती वाढवली. या दोघांनी आठव्या गड्यासाठी अवघ्या ५७ चेंडूत ८९ धावांची ऐतिहासिक भागीदारी करत सामन्याचे चित्र पालटले.

Comments
Add Comment

FIFA FINAL | मुंबईतील फुटबॉल चाहत्यांचा निकाल! अर्जेंटिना की स्पेन? कोण उचलणार विश्वचषक?

मुंबई : एका ऐतिहासिक महामुकाबल्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. मेटलाइफ स्टेडियममध्ये होणारा फिफा विश्वचषक २०२६

Lionel Messi on Lamine Yamal : यामालसोबतच्या व्हायरल फोटोवर मेस्सीची पहिली प्रतिक्रिया,"आता आम्ही एकमेकांचा…"

न्यू यॉर्क : फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना अर्जेंटिना विरुद्ध स्पेन यांच्यात खेळला जाणार आहे. मेस्सीच्या

Most goalscorer : जगातील सर्वाधिक गोल करणारे 5 फुटबॉलपटू

फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या जगातील

Krishnamachari Srikkanth : ईशान ऐवजी राहुलला चौथ्या स्थानावर का खेळवत नाही ? श्रीकांत यांचा भारतीय संघाला थेट सवाल

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमावरून

IND vs ENG : तिसऱ्या सामन्यापूर्वी 'हा' स्टार खेळाडू हॉटेलमधून गायब ! एअरपोर्टपर्यंत सोबत होता पण...

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरु आहे. मालिकेतील तिसरा सामना रविवार, २० जुलै रोजी लंडन

Cricketer Arrest : क्रिकेट विश्वात खळबळ ! भारताला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या खेळाडूला अटक; नेमकं प्रकरण काय ?

श्रीलंका : श्रीलंकेत आज (१८ जुलै) पासून लंका प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेची सुरुवात होणार आहे. यापूर्वीच क्रिकेट