न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड हा सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली.


नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने २० षटकांत सात बाद १६८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला पहिल्या पाच षटकांत दोन धक्के बसले. सलामीवीर पथुम निस्सांका पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मॅट हेन्रीने त्याला शून्यावर त्रिफळाचीत केले. नंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मॅट हेन्रीनेच चरिथ असलंकाला डॅरिल मिशेलकरवी झेलबाद केले. चरिथ असलंका नऊ चेंडूत फक्त पाच धावा करून परतला.


याआधी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्याने २६ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकार मारले. किवींकडून टिम सेफर्टने ८, फिन ऍलनने २३, रचिन रवींद्रने ३२, ग्लेन फिलिप्सने १८, डॅरिल मिशेलने ३, मार्क चॅपमनने शून्य, मिचेल सँटनरने ४७, कोल मॅककोन्चीने नाबाद ३१ धावा केल्या. श्रीलंकेकडून महेश थीकशनने ४ षटकांत ३० धावा देत ३ बळी घेतले तर दुष्मंथा चामीराने ४ षटकांत ३८ धावा देत ३ बळी घेतले. डुनिथ वेलागेने ४ षटकांत २७ धावा देत एक बळी घेतला.

Comments
Add Comment

IND vs SLA Test Series Sai Sudharsan : साई सुदर्शन सराव सामन्याला मुकणार, पण...; पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिलासा

India vs Sri Lanka Test Series : भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी युवा फलंदाज साई सुदर्शन (Sai Sudharsan) याच्या दुखापतीमुळे चाहत्यांची

Rohit Sharma Selection Controversy : रोहित शर्माच्या निवडीवरून BCCI विरुद्ध निवड समिती? आगरकर कोंडीत; पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे?

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वरिष्ठ खेळाडूंच्या निवडीवरून चर्चांना उधाण आले आहे. रोहित शर्माच्या (Rohit

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Sunil Gavaskar on Ajinkya Rahane : 'अजिंक्य रहाणेला कधीच योग्य श्रेय मिळालं नाही'; रहाणेच्या निवृत्तीनंतर सुनील गावसकर भावुक, राहुल द्रविडशी केली तुलना

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय

Brock Lesnar : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. समरस्लॅमच्या मुख्य

Neeraj Chopra : नीरज चोप्रा या महिन्यात लॉझेन डायमंड लीगमध्ये उतरणार

लॉझेन : भारताचा स्टार भालाफेकपटू, माजी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन नीरज चोप्रा २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लॉझेन