श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात न्यूझीलंडचा ६१ धावांनी विजय झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने २० षटकांत सात बाद १६८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला २० षटकांत आठ बाद १०७ धावा करणेच जमले. न्यूझीलंडचा रचिन रवींद्र सामनावीर झाला, त्याने श्रीलंकेच्या चार फलंदाजांना बाद केले तसेच न्यूझीलंडसाठी ३२ धावांचे योगदान दिले.


श्रीलंकेची हाराकिरी


न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाला सामोऱ्या जात असलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. त्यांचा एक फलंदाज शून्यावर बाद झाला तर पाच फलंदाजांनी १० पेक्षा कमी धावा केल्या. पथुम निस्सांकाने शून्य, कुसल मेंडिसने ११, चरिथ असलंकाने ५, पवन रथनायकेने १०, कामिंडू मेंडिसने ३१, दासुन शनाकाने ३, दुषण हेमंथने ३, डुनिथ वेलागेने २९, दुष्मंथ चामीराने नाबाद ७, महेश थीकशनने नाबाद १ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने ४, मॅट हेन्रीने २, मिचेल सँटनरने १ आणि ग्लेन फिलिप्सने १ विकेट घेतली. मॅट हेन्रीने दोन पैकी एक निर्धाव षटक टाकले आणि फक्त ३ धावा देत सलामीवीर पथुम निस्सांकाला शून्य धावांवर त्रिफळाचीत केले तसेच चरिथ असलंकाला पाच धावांवर डॅरिल मिशेलकरवी झेलबाद केले.



न्यूझीलंडची फलंदाजी


प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्याने २६ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकार मारले. किवींकडून टिम सेफर्टने ८, फिन ऍलनने २३, रचिन रवींद्रने ३२, ग्लेन फिलिप्सने १८, डॅरिल मिशेलने ३, मार्क चॅपमनने शून्य, मिचेल सँटनरने ४७, कोल मॅककोन्चीने नाबाद ३१ धावा केल्या. श्रीलंकेकडून महेश थीकशनने ४ षटकांत ३० धावा देत ३ बळी घेतले तर दुष्मंथा चामीराने ४ षटकांत ३८ धावा देत ३ बळी घेतले. डुनिथ वेलागेने ४ षटकांत २७ धावा देत एक बळी घेतला.

Comments
Add Comment

R Praggnanandhaa : प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विजय! कारुआनाला नमवत ग्रँड चेस टूरचा पहिला भारतीय चॅम्पियन

भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने गुरुवारी सेंट लुईस येथे फॅबियानो कारुआनाविरुद्ध शानदार पुनरागमन करत ग्रँड

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक