IPL 2025 : सूर्यकुमार यादव चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबईचे नेतृत्व करणार

मुंबई : क्रिकेटची लोकप्रियता वाढवणारी आयपीएल स्पर्धा शनिवार २२ मार्च पासून सुरू होत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये रविवारी २३ मार्च रोजी दोन सामने होणार आहेत. यापैकी संध्याकाळी साडेसात पासून सुरू होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स आमनसामने असतील. चेन्नईत होणार असलेल्या या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणार आहे.



मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएल २०२५ साठीचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची निवड झाली आहे. पण हार्दिकवर आयपीएलच्या मागच्या हंगामातील मुंबईच्या शेवटच्या सामन्यात स्लो ओव्हररेटसाठी कारवाई करण्यात आली आहे. हार्दिकवर एका सामन्याची बंदी आहे. या बंदीमुळे चेन्नई विरुद्धच्या सामन्यात हार्दिक ऐवजी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्या पॅव्हेलियनमध्ये असेल.



जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे चेन्नई विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. यामुळे हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या दोन प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करण्याचे आव्हान सूर्यकुमारपुढे असेल.

मुंबई इंडियन्स : सूर्यकुमार यादव , रोहित शर्मा , तिलक वर्मा , बेव्हॉन जेकब्स , रायन रिकेल्टन , रॉबिन मिन्झ , कृष्णन श्रीजीथ , हार्दिक पांड्या , नमन धीर , राज बावा , विघ्नेश पुथूर , विल जॅक्स , मिचेल सँटनर , जसप्रीत बुमराह , अरविंद कुमार , अरविंद कुमार , अरविंद कुमार , लिझाद विल्यम्स , कर्ण शर्मा , ट्रेंट बोल्ट , दीपक चहर , सत्यनारायण राजू , मुजीब उर रहमान

चेन्नई सुपरकिंग्स : ऋतुराज गायकवाड , शेख रशीद , आंद्रे सिद्धार्थ सी , राहुल त्रिपाठी , डेव्हॉन कॉनवे , एमएस धोनी , वंश बेदी , शिवम दुबे , रवींद्र जडेजा , विजय शंकर , दीपक हुडा , अंशुल कंबोज , रचिन रवींद्र , जेमी ओव्हरटोन , जी रामनाथो, जी . रविचंद्रन अश्विन , सॅम कुरन , मथीशा पाथिराना , श्रेयस गोपाल , मुकेश चौधरी , नॅथन एलिस , गुर्जपनीत सिंग , नूर अहमद , खलील अहमद

आयपीएल २०२५

  1. पहिला सामना - शनिवार २२ मार्च - कोलकात नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - कोलकाता - थेट प्रक्षेपण संध्याकाळी साडेसातपासून

  2. दुसरा सामना - रविवार २३ मार्च - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स - हैदराबाद - - थेट प्रक्षेपण दुपारी साडेतीनपासून

  3. तिसरा सामना - रविवार २३ मार्च - चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - चेन्नई - थेट प्रक्षेपण संध्याकाळी साडेसातपासून

Comments
Add Comment

Cristiano & Georgina : फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जियाना रॉड्रिगेझ अडकणार लग्नबेडीत; मादेरा येथे रंगणार सोहळा

फुटबॉल जगतातील लोकप्रिय तारा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची पार्टनर, मॉडेल जॉर्जियाना रॉड्रिगेझ यांच्या

IND vs SLA Test Series Sai Sudharsan : साई सुदर्शन सराव सामन्याला मुकणार, पण...; पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिलासा

India vs Sri Lanka Test Series : भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी युवा फलंदाज साई सुदर्शन (Sai Sudharsan) याच्या दुखापतीमुळे चाहत्यांची

Rohit Sharma Selection Controversy : रोहित शर्माच्या निवडीवरून BCCI विरुद्ध निवड समिती? आगरकर कोंडीत; पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे?

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वरिष्ठ खेळाडूंच्या निवडीवरून चर्चांना उधाण आले आहे. रोहित शर्माच्या (Rohit

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Sunil Gavaskar on Ajinkya Rahane : 'अजिंक्य रहाणेला कधीच योग्य श्रेय मिळालं नाही'; रहाणेच्या निवृत्तीनंतर सुनील गावसकर भावुक, राहुल द्रविडशी केली तुलना

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय

Brock Lesnar : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. समरस्लॅमच्या मुख्य