Airtel : आयपीएल सुरू होण्याआधी एअरटेलने वानखेडे स्टेडियमवर नेटवर्क वाढवले

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२५ स्पर्धा २२ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. स्पर्धेच्या सामन्यांच्या तयारीसाठी भारती एअरटेलने वानखेडे स्टेडियमवर सर्वसमावेशक व्यवस्था केली आहे. या सामन्यांना किमान लाखभर क्रिकेट चाहते स्टेडियमवर येण्याची शक्यता आहे. या क्रिकेटप्रेमींना तसेच आसपासच्या परिसरातील हजारो नागरिकांना विनाअडथळा सलग आणि उत्तम नेटवर्क मिळावे यासाठी भारती एअरटेलने नियोजन केले आहे.





एअरटेलने स्टेडियमच्या आसपासच्या भागात आपल्या सध्याच्या सेल साइट्स मधील सात साइट्स वाढवल्या आहेत. ही वाढ केल्याने सामने पहायला येणाऱ्या एअरटेल ग्राहकांना व्हॉईस आणि डेटा कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येणार आहे. नेटवर्कची श्रेणी वाढविण्याचे धोरणात्मक नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा केल्या जाणाऱ्या प्रेक्षकांना सामावून घेता येईल.



तयारीवर बोलताना, आदित्य कुमार कंकारिया, सीईओ, मुंबई भारती एअरटेल म्हणाले, "आगामी आय.पी.एल स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून आम्ही वानखेडे स्टेडियममधील मोबाइल नेटवर्कच्या पायाभूत सुविधांची श्रेणी वाढविली आहे. आमचे ग्राहक अखंडपणे जोडलेले राहतील हे या वाढीमुळे सुनिश्चित केले जाणार आहे आणि त्यायोगे ग्राहकांना वास्तविक काळात (रिअल-टाइममध्ये) कार्यक्रमाची उत्साही ऊर्जा टिपता येईल आणि इतरांना त्यात सहभागी करून घेता येईल."



मुंबई शहरात अखंड आणि सर्वत्र आढळणारा नेटवर्क अनुभव देता यावा म्हणून विमानतळ, रेल्वे स्थानके, महत्वपूर्ण ठिकाणे, ज्यात सामील आहेत मरीन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट, चर्चगेट रेल्वे स्टेशन, मरीन लाइन स्टेशन आणि गेट वे ऑफ इंडिया, अशा प्रमुख ठिकाणी व्यापक नेटवर्क अनुकूल करण्याचे आयोजन केले गेले आहे. शहरातील ओबेरॉय (ट्रायडंट) आणि ताज कुलाबा सोबतच सर्व प्रीमियम हॉटेल्स मध्ये सुद्धा कव्हरेज वाढविण्यासाठी व्यापक नेटवर्क मूल्यांकन करण्यात आले आहे.



एअरटेलने खास करून आय.पी.एल साठी पावले उचलली आहेत व देशातील सर्व स्टेडियममध्ये आपले नेटवर्क वाढवले आहे जेणेकरून मार्चपासून सुरू होऊन मे २०२५ पर्यंत सुरू राहणाऱ्या क्रिकेट उत्साहासाठी ग्राहकांना उत्तम सेवा देता येईल.
Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५