मुंबई महापालिकेची सर्व परिपत्रके मराठीतूनच काढा; भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांची सभागृहात मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेचे कामकाज हे शंभर टक्के मराठीतून असतानाही आजही कामगारां विषयांच्या तसेच इतर बाबींची परिपत्रके ही इंग्रजी भाषेतून काढली जात आहे. त्यामुळे २७ फेब्रुवारी या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महापौरांनी मुंबई महापालिकेच्यावतीने काढली जाणारी सर्व प्रकारची परिपत्रके ही मराठी भाषेतूनच काढली जावीत अशाप्रकारचे निर्देश देण्याची मागणी महापालिका सभागृहात भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांनी केली.


मुंबई महापालिकेच्या सभेपुढे महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी प्रशसनाच्यावतीने अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रस्तावाला अग्रक्रम देण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला महापौरांनी परवानगी दिल्यानंतर या प्रस्तावावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी अभियंत्याच्या बढतीचे प्रस्ताव स्थापत्य शहर समितीपुढे मांडले जात असताना इथे का मांडले आणि २१ अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त् असताना सहा अधिकाऱ्यांच्या बढतीचे प्रस्ताव का आणले असा सवाल केला. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी २१ जणांच्या नावाचे प्रस्ताव येणे गरजेचे असताना सहा जणांच्या बढतीचे प्रस्ताव आले, मग उर्वरीतांच्या बढतीचे प्रस्ताव का आले नाही याबाबत शंका उपस्थित करत मग इतर अधिकाऱ्यांवर हा अन्याय नाही का असा सवाल त्यांनी केला.


तर भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांनी हा प्रस्ताव म्हणजे सलिम जावेदची पटकथा असल्याचे सांगत साडेचार वर्षांत किती अधिकाऱ्यांना बढती दिली गेली याची माहिती दिली जावीत,तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे किती आहेत याचीही दिली जावी अशी मागणी केली.तसेच या अधिकाऱ्यांच्या बढतीसह कामगारांसंदर्भात परिपत्रकेही इंग्रजी भाषेत काढली जात असल्याने छेडा यांनी खंत व्यक्त केला. त्यामुळे महापौरांनी आजच प्रशासनाला निर्देश देत यापुढे सर्व प्रकारचे परिपत्रके ही मराठी भाषेतूनच काढली जावीत,असे सांगावे आणि मराठी भाषा दिनाचे औचित साधून हे निर्देश तात्काळ देवून यापुढे शुध्द मराठीतून परिपत्रक काढली जातात का हेही पाहावे अशा प्रकारच्या सूचना केल्या. यावर सभागृहात सर्वच नगरसेवकांनी टाळ्या वाजवून या सूचनेचे कौतूक केले.

Comments
Add Comment

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा

Lokmanya Tilak road fire : लोकमान्य टिळक रोडवर आग; परिसरातील नागरिकांची पळापळ!

मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.