Anil Ambani : अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; ईडीनंतर सीबीआयकडून कार्यालय आणि निवासस्थानी शोधमोहीम सुरु

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने म्हणजेच सीबीआयने मेसर्स रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या विरोधात दुसरा गुन्हा नोंदवला आहे. बँक ऑफ बडोदाकडून २४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे, कट रचणे, फसवणूक करणे या आरोपांप्रकरणी भारतीय दंड संहितेअंतर्गत आणि गुन्हेगारी गैरवर्तन आणि अधिकृत पदाचा गैरवापर, यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत RCoM, मेसर्स रिलायन्स कम्युनिकेशन्सचे प्रवर्तक आणि माजी अध्यक्ष अनिल अंबानी आणि इतरांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मेसर्स रिलायन्स कम्युनिकेशन्सने घेतलेल्या कर्जाच्या रकमेतून संबंधित पक्षांसोबत बनावट व्यवहार निर्माण करून निधी वळविणे आणि गैरवापर केल्यामुळे बँक ऑफ बडोदाचे २ हजार २२० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप एफआयआरमध्ये आहे. तसेच मेसर्स रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या लेखापुस्तकांमध्ये फेरफार करून अनियमितता लपविण्यात आल्याचेही आरोप आहेत.


सदर खाते २०१७ मध्येच अनुत्पादक मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र अनिल अंबानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे, संबंधित खात्यांना फसवणूक म्हणून घोषित करण्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. २३ फेब्रुवारी रोजी ही स्थगिती उठविण्यात आल्यानंतर बँक ऑफ बडोदाने तक्रार नोंदवली आणि सीबीआयने तात्काळ हे प्रकरण हाती घेतले.


११ बँकांच्या कन्सोर्टियमची प्रमुख बँक असलेल्या एसबीआयने दाखल केलेल्या तक्रारीवरून सीबीआयने मेसर्स रिलायन्स कम्युनिकेशन्सविरुद्ध एक प्रकरण आधीच दाखल केले आहे. मात्र बँक ऑफ बडोदा या कन्सोर्टियमचा भाग नव्हती आणि हे रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेडने बँक ऑफ बडोदा, तत्कालीन विजया बँक आणि तत्कालीन देना बँकेकडून घेतलेले वेगळे कर्ज आहे. विजया बँक आणि देना बँक आता बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाली आहे. या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर, सीबीआयने अनिल अंबानी यांच्या निवासस्थानी तसेच मे.रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या नोंदणीकृत कार्यालयांत शोधमोहीम राबवली. या कर्ज व्यवहारांशी संबंधित विविध दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Mayor Bungalow : महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांची निविदा रद्द

महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर

Property Tax Rules : ग्रंथालयांना आकारला जातो व्यावसायिक दराने कर

निवासी दर कर आकारण्याची महापालिकेकडे नगरसेवकाची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील ग्रंथालयांंना सध्या

BMC : महापालिका सभागृहासह समित्यांचे कामकाज पेपरलेस

सर्व नगरसेवकांना येत्या महिन्याभरात मिळणार टॅब मुंबई (सचिन धानजी) : मुंबइ महापालिकेतील कारभार पेपरलेस

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम