महापालिका सभागृहात गुंजणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’; महापालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूर

मुंबई: महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची धून आता महापालिका सभागृहातही लावली जाणार आहे. भाजपच्या नगरसेविका आणि शिक्षण समिति अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी केलेल्या सूचनेला मंजुरी देत महापालिका सभागृहात एकमताने याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे आता महापालिका सभागृहात या राज्यगीताची धून ऐकायला मिळणार आहे.


महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्रातील जनतेच्या अभिमानाचे प्रतीक असून ते ऐकताच प्रत्येक मराठी मन अभिमानाने भरून येते. शासनाच्या निर्णयानुसार हे गीत शासकीय कार्यक्रमांमध्ये तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये सकाळच्या परिपाठाचा अनिवार्य भाग करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, मराठी अस्मिता आणि संस्कृतीची जपणूक यांची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.


मराठी भाषा संवर्धन आणि सांस्कृतिक अस्मितेच्या जतनासाठी कवी राजा बढे यांच्या ओजस्वी शब्दरचनेतून आणि शाहीर साबळे यांच्या दमदार आवाजातून साकारलेले हे गीत नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे गरजेचे असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात राष्ट्रगीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून वाजविण्यात यावी, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी महापालिका सभागृहात केली. ही सूचना महापौरांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत मंजूर केली.


या प्रस्तावामुळे महानगरपालिकेच्या कामकाजात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभिमानाची नवी भर पडेल, असा विश्वास शिरवडकर यांनी व्यक्त केला होता. या ठरावामुळे याची अंमलबजावणी लवकरच महापालिका सभागृहात केली जाणार आहे.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा