‘आयुष्मान भारत’साठी वयोमर्यादा ७० वरून ६० करण्याची शिफारस

  132

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आयुष्मान योजनेंतर्गत मोफत उपचारासाठी वयोमर्यादा ६० वर्षे असावी. तसेच उपचारासाठी देण्यात येणारी ५ लाखांची रक्कमही दुप्पट करून १० लाख करण्यात यावी, अशी शिफारस आरोग्य आणि कुटुंब कल्याण संसदीय समितीने केंद्र सरकारला केली आहे. सध्या फक्त ७० वर्षांच्या वृद्धांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे.



राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखालील आरोग्य आणि कुटुंब कल्याण संसदीय समितीने केंद्र सरकारला ही शिफारस केली आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांना या आरोग्य योजनेचा लाभ मिळावा. आरोग्य सेवेवर होणारा प्रचंड खर्च लक्षात घेऊन आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या संसदीय स्थायी समितीने राज्यसभेत आपला १६३ वा अहवाल सादर केला. तसेच ही शिफारस केली आहे.



संसदीय समितीने निदर्शनास आणून दिले की, आयुष्मान भारत अंतर्गत अनेक चाचण्या आणि उच्च दर्जाचे उपचार समाविष्ट नाहीत. समितीने शिफारस केली आहे की, योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या उपचाराचे पुनरावलोकन केले जावे. गंभीर आजारांच्या उपचारांशी संबंधित नवीन पॅकेज/प्रक्रिया आणि रेडिओलॉजिकल डायग्नोस्टिक्स (सीटी स्कॅन, एमआरआय आणि न्यूक्लियर इमेजिंग) सारख्या महागड्या तपासण्या/निदानांचा समावेश योजनेत करावा.

जगातील सर्वात मोठी विमा योजना

दरम्यान, केंद्राने २०१७ मध्ये ही योजना सुरू केली आहे. आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी विमा योजना आहे. या योजनेंतर्गत देशभरातील निवडक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात. आयुष्मान योजनेंतर्गत जुनाट आजारांचाही समावेश होतो. कोणत्याही आजारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि त्यानंतरचा खर्च यात समाविष्ट आहे. यामध्ये वाहतुकीवरील खर्चाचा समावेश होतो. यामध्ये सर्व वैद्यकीय चाचण्या, ऑपरेशन्स, उपचार इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
Comments
Add Comment

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या

पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी

नवी दिल्ली : पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी लागू करण्यात आली आहे. भारत सरकारने निर्देश

जीएसटीच्या १२ टक्के स्लॅबमध्ये बदलाची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मुलाखतीत दिले संकेत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२ टक्के जीएसटी स्लॅबमधील वस्तूंचा ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश करण्याची तयारी

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत, या दरम्यान ते ब्रिक्स शिखर

नॅशनल हेरॉल्ड : ५० लाखात बळकावली २ हजार कोटींची मालमत्ता, राहुल आणि सोनिया गांधींसंदर्भात ईडीचा कोर्टात दावा

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधींनी ५० लाखात २ हजार कोटींची मालमत्ता