Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Holi Festival : मुंबईत धूलिवंदन सणाला गालबोट! भाईंदरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला चाकूने...

Mumbai Holi Festival : मुंबईत धूलिवंदन सणाला गालबोट! भाईंदरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला चाकूने भोसकले

मुंबई : जगभरात सगळीकडे रंगांची उधळण सुरु असताना मुंबईत रंगपंचमीला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. सणसमारंभाला नागरिकांच्या रक्षणासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या रक्षकावरच हल्ला झाला. या हल्ल्यात ड्युटीवर असलेला कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

National Park Fire : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भीषण आग; तळीरामांचा प्रताप

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदरच्या मुंबई मार्केट गल्लीमधील बाबूभाई मिस्त्री चाळ येथे दोन गटात भांडण झाले असल्याची माहिती मिळाल्यावरून भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार काशिनाथ भानुसे घटनास्थळी पोहोचले असता तेथे त्यांच्यावर दोन जणांनी धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र कांबळे यांनी त्वरित तपास करून बाबू नेपाळी आणि दिलीप भीमबहाद्दूर खडका या दोघांना अटक केली आहे. या घटनेने भाईंदर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -