Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाMI vs DC WPL 2025 : दिल्ली विरुद्ध मुंबई महाअंतिम सामना आज...

MI vs DC WPL 2025 : दिल्ली विरुद्ध मुंबई महाअंतिम सामना आज रंगणार

नवी दिल्ली : एका बाजूला क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या १८ व्या मोसमाचे वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या मोसमातील अंतिम सामन्याची तयारी सुरु झाली आहे. मुंबई इंडियन्स वूमन्सने गुरुवारी १३ मार्चला गुजरात जायंट्सचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर त्याआधी दिल्ली कॅपिट्ल्सने थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यामुळे आता डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामाचा विजेता होण्यासाठी मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात थरार रंगणार आहे. दिमाखदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सच्या संघाने WPL २०२५ Final मध्ये आता दमदार एंट्री केली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने एलिमिनेटरमध्ये गुजरात जायंट्स संघाला धुळ चारली आणि आपले फायनलचे तिकीच निश्चित केले. (MI vs DC WPL 2025)

Shreyas Iyer : तो भारताचा सर्वात विश्वासार्ह एकदिवसीय फलंदाज-अनिल कुंबळे

मुंबई इंडियन्सने सर्वाधिक धावांचा डोंगर उभारत आपल्या विजयाचा भक्कम पाया रचला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चोख कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २१३ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग गुजरातच्या संघाला करता आला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरच्या सामन्यात गुजरात जायंट्सवर ४७ धावांनी विजय साकारला आणि अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. मुंबई इंडियन्सच्या संघाने दुसऱ्यांदा स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. (MI vs DC WPL 2025)

मुंबई इंडियन्सने गुजरातच्या संघाला आपल्यापुढे लोटांगण घालण्यास भाग पाडले. कारण मुंबई इंडियन्सने तुफानी फटकेबाजी करत गुजरात जायंट्सच्या गोलंदांच्या नाकी नऊ आणले होते. कारण यापूर्वी मुंबई इंडियन्सने जी धावसंख्या कधीच उभारता आली नव्हती, ती त्यांनी या सामन्यात उभारली. यापूर्वी मुंबई इंडियनेसने या स्पर्धेत सर्वाधिक २०७ एवढी धावसंख्या उभारली होती. पण या सामन्यात मुंबई इंडियन्सने आपलाच सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला आणि त्यांनी २१३ धावांचा डोंगर रचला. या सामन्यात हिली मॅथ्यूज आणि नॅट ब्रंट यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली आणि मुंबई इंडियन्सची धावसंख्या वेगाने वाढवली. सर्वात महत्वाची आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे या दोघीही ७७ धावांवरच बाद झाला. कर्णधार हरमनप्रीत कौरने अखेरच्या षटकांत २१ चेंडूंत ३६ धावांची खेळी साकारल्यामुळे मुंबई इंडियन्सला एवढी मोठी धावसंख्या रचता आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -