Wednesday, March 19, 2025
Homeक्रीडाShreyas Iyer : तो भारताचा सर्वात विश्वासार्ह एकदिवसीय फलंदाज-अनिल कुंबळे

Shreyas Iyer : तो भारताचा सर्वात विश्वासार्ह एकदिवसीय फलंदाज-अनिल कुंबळे

मुंबई : माजी फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) भारताचा सर्वात विश्वासार्ह एकदिवसीय फलंदाज म्हटले आहे. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील अय्यरच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर कुंबळे यांनी विशेष प्रकाश टाकला आहे.

भारताने न्यूझीलंडला पराभूत करून २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) जिंकली आणि तिसऱ्यांदा या प्रतिष्ठित स्पर्धेवर नाव कोरले. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)ने या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने पाच डावांत २४३ धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सरासरी ४८.६० आणि स्ट्राईक रेट ७९.४१ होती.

Indian Cricketers : मुंबई इंडियन्सच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये झळकणार मराठी अभिनेता

ESPNcricinfo वरील संभाषणात कुंबळे यांनी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) सर्वात विश्वासार्ह फलंदाज म्हटले आहे. ते म्हणाले, “हो, तो भारताचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज आहे. आम्ही हे विश्वचषकात आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहिले. चौथ्या क्रमांकावर फलंदाज सातत्यपूर्ण असणे आवश्यक आहे आणि श्रेयसने ही जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.”

कुंबळे यांनी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) च्या मधल्या फळीत खेळण्याच्या भूमिकेचेही कौतुक केले. ते म्हणाले, “श्रेयसचे मुख्य काम डाव संपवणे नव्हे, तर मधल्या षटकांत डावावर नियंत्रण ठेवणे आहे. तो ३५ ते ४० व्या षटकापर्यंत संघाला स्थिर ठेवतो, ज्यामुळे केएल राहुल आणि हार्दिक पंड्यासारख्या फिनिशर्सला सामन्याचा शेवट करण्यासाठी आदर्श परिस्थिती मिळते.”

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) च्या प्रभावी भागीदाऱ्यांवरही कुंबळे यांनी भर दिला. त्यांनी सांगितले केले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीसोबत आणि अंतिम सामन्यात अक्षर पटेलसोबत श्रेयसने केलेल्या भागीदाऱ्या विजयात महत्त्वाच्या ठरल्या.

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. पाकिस्तानविरुद्ध ५६ आणि न्यूझीलंडविरुद्ध ७९ धावा करत त्याने भारताला मजबूत स्थितीत नेले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने ६२ चेंडूत ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -