Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीSyed Abid Ali : भारताचे दिग्गज अष्टपैलू सईद अबिद अली यांचे निधन

Syed Abid Ali : भारताचे दिग्गज अष्टपैलू सईद अबिद अली यांचे निधन

सुनील गावसकरांकडूनही शोक व्यक्त

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू सईद अबिद अली (Syed Abid Ali) यांचे बुधवारी (१२ मार्च) निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. ज्यावेळी फक्त प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले जायचे, त्यावेळी वनडे क्रिकेटप्रमाणे त्यांची खेळण्याची शैली होती. ते उजव्या हाताने मध्यमगी गोलंदाजी करायचे. तसेच त्यांचे क्षेत्ररक्षणही अफलातून हेते, तर तळात ते चांगली फलंदाजी करायचे.

९ सप्टेंबर १९४१ रोजी हैदराबादला जन्म झालेल्या सईद अबिद अली यांनी १९६७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड येथे भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यांनी २९ कसोटी सामने खेळताना ४७ विकेट्स घेतल्या. त्यांनी १९७४ साली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ५ वनडे सामने खेळले असून ७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी कसोटीत १०१८ धावाही केल्या, ज्यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी एकूण २१२ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ३९७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ८७३२ धावा केल्या आहेत. त्यांनी लिस्ट ए क्रिकेटचे १२ सामने खेळले, ज्यात १९ विकेट्स घेतल्या आणि १६९ धावा केल्या.

Shreyas Iyer : तो भारताचा सर्वात विश्वासार्ह एकदिवसीय फलंदाज-अनिल कुंबळे

माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी लिहिले, ‘खूप दु:खद बातमी आहे. त्यांचं हृदय सिंहासारखं होतं. ते संघासाठी काहीही करायला तयार असायचे. जेव्हा गरज पडेल तेव्हा मधल्या फळीतील फलंदाज असूनही त्यांनी सलामीलाही फलंदाजी केली. लेग कॉर्डनला आपल्या सर्वोत्तम फिरकी चौकडीच्या गोलंदाजीवर काही अफलातून झेल घेतले. जर मला नीट आठवत असेल, तर नवीन चेंडूने गोलंदाजी करणाऱ्या सईद यांनी कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दोनदा विकेट घेण्याचा अनोखा विक्रमही केला होता. त्यांना धावायला आवडायचे. माझ्या पदार्पणाच्या सामन्याच त्याला फलंदाजीत बढती मिळाल्यानंतर त्यांची ही रणनीती महत्त्वाची ठरली होती, ज्यामुळे काही ओव्हरथ्रोमुळे दबाव कमी झाला होता. ते जंटलमन होते.’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -