Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीGermany Car Attack : जर्मनीत कार चालकाने लोकांना चिरडले; दोघांचा मृत्यू, अनेक...

Germany Car Attack : जर्मनीत कार चालकाने लोकांना चिरडले; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

बर्लिन : जर्मनीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. जर्मनीतील मॅनहाइम येथील एका कार्निव्हल दरम्यान कार चालकाने लोकांना चिरडले आहे. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनहाइम येथील एका कार्निव्हल दरम्यान कार चालकाने लोकांना चिरडले आहे.यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर २५ जण जखमी झाले. अपघातानंतर तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले. आणि त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत कार चालकाला अटक केली आहे. या प्रकरणात इतर कोणी सहभागी असल्याचे माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांनी सांगितले की, मॅनहाइममधील परिस्थिती अद्याप गंभीर आहे.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेणं पडलं महागात, अमेरिकेने युक्रेनला युद्धात केली जाणारी मदत रोखली

पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून कार चालकाने हा अपघात जाणूनबुजून केला की चुकून अद्याप हे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आसपासच्या परिसरात बंदोबस्त लागू केला आहे. सध्या या घटनेची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तीन महिन्यामध्ये कार अपघाताची ही तिसरी घटना आहे.सध्याच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात हाय अर्लट जारी करण्यात आला असून हा दहशतवादी हल्ला असवल्याचे म्हटले जात आहे.

लोकांना शहराच्या केंद्रापासून दूर राहण्याचे आणि परिस्थिती सामान्य होईपर्यंत घरातून बाहरे न पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी जर्मनीच्या म्युनिख शहरात गुरुवारी (१३ फेब्रुवारी २०२५) एका कारने गर्दीत घुसून २० लोकांना चिरडले आहे. या भयानक घटनेत लहान मुलांसह अनेक लोक गंभीर जखमी झाले होते. डिसेंबर २०२४ मध्ये देखील ख्रिसमस मार्केटमध्य़े शेकडो लोकांना भरधाव वेगात येऊन लोकांना चिरडले होते. या हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू, तर ५० हून अधिक लोक जखमी झाले होते. यामध्ये ७ भारतीयांचाही समावेश होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -