वॉशिंग्टन: व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलिदिमीर झेलेंस्की यांच्यासोबतच तिखट चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी रशियाविरुद्ध युक्रेनला दिली जाणारी लष्कर मदत रोखली आहे.
हे आदेश तातडीने लागू करण्यात आले आहेत. व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की युक्रेनचे राष्ट्राध्यश्र झेलेन्स्की यांना खरोखर शांतता प्रस्थापित व्हावी असे वाटत असल्याचे सुनिश्चित होत नाही तोपर्यंत ही मदत रोखली जाणार आहे.
अधिकाऱ्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की अमेरिका लष्कर मदत रोखून याची समीक्षा करत आहे. दरम्यान, अमेरिकेचे हे पाऊल म्हणजे झेलेस्की यांनी ट्रम्प यांच्याशी घातलेल्या वादाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अमेरिकेच्या या कृतीमुळे एक अब्ज डॉलर हत्यारे आणि दारूगोळासंबंधीच्या मदतीवर परिणाम होणार आहे.