स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे हा त्याच्या कंटेंटसाठी नेहमीच चर्चेत असतो. कधी कधी या कंटेंटला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला तर कधी त्याच चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले. मात्र यावेळी त्याच्या विनोदांपेक्षा एका वादग्रस्त घटनेमुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारा " ३७० ची बिर्याणी " ह्या व्हिडिओमुळे प्रणित मोरे चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रकरणाने वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर जाहीर माफीनामा त्याला प्रसिद्ध करावा लागला. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रणितने मोठा निर्णय घेतला असून आपले इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केलंय.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडून आलेल्या २२७ नगरसेवकांसह १० नामनिर्देशित नगरसेवकांना (Corporators) अद्याप मानधन मिळाले नसल्याचे ...
काय आहे नक्की ३७० ची बिर्याणी प्रकरण ? हा संपूर्ण वाद प्रणितच्या एका लाईव्ह शोदरम्यान घडलेल्या घटनेमुळे सुरू झाला. शोमध्ये उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने स्वतःचा डेटिंगचा अनुभव सांगताना महिलांबाबत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील टिप्पणी केली आणि हे सगळं चालू असतांना प्रणित त्याच्या बोलण्यावर हसताना आणि आनंद घेताना दिसला. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडीओमध्ये हिमांशू जांगरा नावाच्या तरुणाने एका महिलेसोबत डेटसाठी बाहेर गेल्याचा अनुभव सांगितला. दोघांनी मिळून चिकन बिर्याणी खाल्ली होती, त्या नंतर त्या महिलेने त्याला घरी सोडण्यास सांगितले पण आपण आता हिला ३७० ची बिर्याणी दिली आहे तर हिला सहजासहजी सोडणार नाही पैसे तर वसूल केले पाहीजे असे वक्तव्य त्याने केले. यावर उपस्थित तरुणवर्ग टाळ्या वाजवून, दाद देऊन त्याला ऐकत होता. एवढंच नाही, तर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देऊनही तरुण हिमांशू जांगरा गप्प बसला नाही तर त्या नंतर त्या महिलेसोबत त्याने काय केलं ते पण सांगितलं त्याने कशी जवळीक साधली, तिला कुठे स्पर्श केला असे तपशीलही तो रंगवून सांगू लागला. हा व्हिडिओ व्हायरल होताच यातील अनेक क्लिप्स व्हायरल झाल्या. नंतर मात्र या वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झालं.
ठाणे : वाढदिवस अधिक खास करण्यासाठी थीम (Theme) केकची निवड करणाऱ्या पालकांसाठी धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. ३ वर्षीय रियांशने वाढदिवसाच्या केकवरील ...
संपूर्ण प्रकरण त्या मुलाच्या म्हणजेच हिमांशू जांगराच्या एवढ्या अंगाशी येऊन बसलं कि त्याला त्याच्या नोकरीवरून निलंबित करण्यात आलं आणि ह्याचा फटका फक्त हिमांशू जांगराला नाही बसला तर प्रणित मोरेला सुद्धा बसला. तो एवढं सगळं बोलत असतांना प्रणितने सुद्धा त्याला साथ दिली आणि आनंद घेतला त्यामुळे सोशल मीडियावर तो चांगलाच ट्रोल झाला आणि त्याने शेवटी स्वतःचं इन्टाग्राम अकाउंट बंद केलं.






