मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेली चित्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिल्मसिटी जवळ वसलेल्या झोपड्यांना भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सौरव गांगुलीच्या कारचा दुर्गापूर एक्सप्रेसवे वर अपघात, थोडक्यात बचावला क्रिकेटर
मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव पूर्वेत फिल्मसिटीजवळ असलेल्या संतोष नगर परिसरात झोपडपट्टीत आग लागल्याची घटना घडली. ही आग काल (दि २०) संध्याकाळी साडे सातच्या सुमारास लागली. घरांमध्ये असलेल्या सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट होऊ लागल्यानं आग झपाट्यानं वाढत गेली.
अनेक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच खबरदारी म्हणून रुग्णवाहिकेचीही सोय करण्यात आली होती. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.