Wednesday, June 10, 2026

London Marathi Family Death : लंडनमध्ये मराठी दाम्पत्य आणि मुलाचा मृत्यू; तपासात समोर आली धक्कादायक माहिती

London Marathi Family Death : लंडनमध्ये मराठी दाम्पत्य आणि मुलाचा मृत्यू; तपासात समोर आली धक्कादायक माहिती

लंडन : ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये (London) एका मराठी कुटुंबाच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भारतीय वंशाचे राकेश पै, त्यांची पत्नी अदिती परळकर आणि त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा सिड यांचा मृत्यू (Death) झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ब्रिटिश माध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना आत्महत्येशी संबंधित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी कुटुंबियांनी हा दावा फेटाळून लावला आहे. माहितीनुसार, हे कुटुंब लंडनमधील एका उंच निवासी इमारतीच्या ३६व्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये राहत होते. २७ मे रोजी तिघांनीही इमारतीच्या बाल्कनीतून (Balcony) उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा तपास सध्या स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.

ब्रिटिश वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, सिडला लहानपणापासूनच अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत होता. त्याला किडनीचा (Kidney) गंभीर आजार होता आणि त्याला विशेष शैक्षणिक मदतीचीही आवश्यकता होती. सिडची देखभाल करण्याची मुख्य जबाबदारी अदिती परळकर यांच्यावर होती. मुलाच्या उपचारांसाठी आणि संगोपनासाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतल्याचे सांगितले जाते.

कुटुंबियांच्या माहितीनुसार, मुलाच्या उत्तम उपचारांच्या आशेने हे कुटुंब (Family) काही वर्षांपूर्वी लंडन सोडून मुंबईत (Mumbai) आले होते. मात्र वैद्यकीय पर्याय मर्यादित असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी पुन्हा ब्रिटनमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. या काळात कुटुंबावर मानसिक आणि भावनिक ताण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

कुटुंबाच्या एका जवळच्या मित्राने ब्रिटिश माध्यमांशी (British Media) बोलताना सांगितले की, अदिती परळकर यांना मुलाची काळजी, नोकरी आणि घराची जबाबदारी एकाच वेळी सांभाळावी लागत होती. यूकेमध्ये त्यांना कुटुंबियांचा आधार नसल्याने परिस्थिती अधिक कठीण बनली होती. सततच्या तणावाचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही मित्राने सांगितले.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना स्थानिक खासदार नील कॉइल यांनी ती अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना असल्याचे म्हटले. काही स्थानिक नागरिकांनी हा प्रसंग प्रत्यक्ष पाहिल्याची माहितीही त्यांनी दिली. मुलाच्या गंभीर आरोग्य समस्यांमुळे कुटुंबावर मोठा मानसिक ताण असल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

अदिती परळकर या बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील अनुभवी सीनियर कन्सल्टंट होत्या. त्यांनी युनायटेड किंगडममधील अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांवर काम केले होते. हिथ्रो विमानतळाशी संबंधित प्रकल्पांसह विविध मोठ्या बांधकाम उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या व्यावसायिक कौशल्यामुळे आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांची उद्योगक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >