Thursday, March 20, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकManikrao Kokate : कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कोर्टाने सुनावली २ वर्षांची शिक्षा;...

Manikrao Kokate : कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कोर्टाने सुनावली २ वर्षांची शिक्षा; कोकाटेंची आमदारकी धोक्यात?

नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना न्यायालयाने (Court) मोठा दणका दिलाय. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे (Sunil Kokate) यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik Court) २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. माणिकराव कोकाटे यांना २ र्षांचा कारावास आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. १९९५ साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे (Tukaram Dighole) यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे.

भाजपाच्या रेखा गुप्ता झाल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनवाली आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. यात त्यांनी माणिकराव कोकाटे यांंच्यावर १९९५ साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता. आता याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते असे बोललं जात आहे.

आमदारकी धोक्यात?

माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे जर याला वरच्या कोर्टाने स्थगिती दिली नाही, तर मात्र त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सारकवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १९९५ ते ९७च्या काळात सरकारच्या १० टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात सुरू होते. आता यावर नाशिक जिल्हा न्यायालयाने निर्णय देत कोकाटेंना चांगलाच झटका दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -