महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी शासकीय ध्वजारोहण सोहळे आयोजित करण्यात आले होते. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने शासकीय ध्वजारोहण केले. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना आपल्या भावना अनावर झाल्या आणि त्यांचे डोळे पाणावले.
मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे आणि स्पष्ट ...
ठाणे : महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. साकेत मैदान येथे ...
आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने बीड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रध्वजास वंदन केले. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आणि जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी पुन्हा दृढ केला.
याप्रसंगी सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या… pic.twitter.com/Dkz6sXb5ug — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 1, 2026
पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी सर्वप्रथम राज्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. यानंतर बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. अत्यंत भावूक होत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, "माझ्यासाठी हा क्षण अत्यंत भावनिक आहे. आज मी येथे ध्वजारोहण केले आहे. बीडच्या तमाम जनतेला मी एवढेच सांगू इच्छिते की, दादांनी या जिल्ह्यासाठी जी स्वप्ने पाहिली होती, जे 'ड्रीम प्रोजेक्ट्स' हाती घेतले होते, ते सर्व पूर्ण करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करेन. बीड जिल्ह्याला महाराष्ट्रातील एक अव्वल आणि प्रगत जिल्हा म्हणून पुढे आणण्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावेन."





