मुंबई : मनोरंजन क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाला पायरसीचा फटका बसला आहे. संभाजी महाराजांच्या जीवनकथेवर आधारित असणाऱ्या छावा सिनेमाला पहिल्याच दिवशी भरभरून प्रेम मिळालं. मात्र पायरसीमुळे छावा सिनेमा अडचणीत सापडू येऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Worli : वरळी अस्फाल्टसह छत्रपती शिवाजी महाराज मार्केटच्या जागेचाही होणार लिलाव
‘छावा’ हा हिंदी चित्रपट शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. पण प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाची पहिल्या दिवसाची तिकिटे विकली गेली होती. चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट तब्बल १३० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी याची बॉक्स ऑफिसवर २.३५ कोटींची कमाई झाली. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना तसेच औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळत आहेत.
मात्र हा चित्रपट आता ऑनलाईन लीक झाला आहे. ‘छावा’च्या रिलीजनंतर अवघ्या काही तासांत ‘छावा’ ऑनलाइन लीक झाला आहे. अनेक पायरसी वेबसाइटवर ‘छावा’ चित्रपट अपलोड करण्यात आला आहे. ज्यामुळे काही प्रमाणात निर्मात्यांना फटका बसला आहे. छावा मूव्ही डाउनलोड आणि छावा फ्री एचडीसारखे कीवर्ड देखील ट्रेंडिंग आहेत. या पायरसीमुळे छावा सिनेमाची कमाई मंदावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Arun Gawli : अरुण गवळींच्या मुलीच्या लग्नात राज ठाकरेंची हजेरी
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म बघायला मिळणार ‘छावा’ ?
व्हॅलेंटाईनच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर डरकाळी फोडली. सलग दोन दिवस ‘छावा’ ने ५० कोटींची कमाई करत तब्बल ८ चित्रपटांना मागे टाकलं आहे. अशातच ‘छावा’च्या रिलीजनंतर अवघ्या काही तासांत ‘छावा’ ऑनलाइन लीक झाला. नेटफ्लिक्सने चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स खरेदी केले आहेत. ‘छावा’ तीन ते चार महिन्यांनंतर घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र अद्याप निर्मात्यांनी ओटीटी रिलीजच्या डेटची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.