मुंबई : महापालिका प्रशासनाने उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून विचार करत वापरात नसलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेसह वरळीतील अस्फाल्ट प्लांट अणि मलबार हिल येथील बेस्टचे रिसिव्हिंग स्टेशनच्या जागा लिलाव पध्दतीने भाडे तत्त्वावर जाहिरात प्रदर्शित केल्यानंतर याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर महापालिकेने वरळी अस्फाल्टच्या ( डांबर प्रकल्प ) जागेच्या लिलावासाठी जाहिरात प्रदर्शित केली असून आता मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेसाठीही जाहिरात प्रदर्शित केली जाणार आहे. लवकरच मंडईची जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासकांच्या मंजुरीने जाहिरात प्रदर्शित केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Arun Gawli : अरुण गवळींच्या मुलीच्या लग्नात राज ठाकरेंची हजेरी
महापालिकेने एकमेव वरळी अस्फाल्ट येथील १० हजार ८४७ चौरस मीटरची जागा जागा लिलाव पध्दतीने भाडेकरारावर देण्यासाठी २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज प्राप्त होतील अशाप्रकारे जाहिरात प्रदर्शित केली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा भाडेकरावर देण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने अखेर महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी त्यांची समजूत काढल्याने या भूखंडावरील स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतची जाहिरात लवकरच प्रदर्शित करून स्वारस्य अर्ज मागवले जातील, अशी माहिती मिळाली. मंडईच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ ८११६ चौरस मीटर एवढे असून याठिकाणी भविष्यात शॉपिंग सेंटर तथा मॉल उभाता येवू शकते.
सध्या मडईच्या जागेवर मंडई आणि महापालिका कार्यालय असे आरक्षण असले तरी भविष्यात भाडेकरारावर हा भूखंड दिल्यानंतर हे आरक्षण बदलले जावू शकते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वरळी अस्फाल्टच्या जागेतून महापालिकेला सुमारे २०६९ कोटी रुपये आणि मंडईच्या जागेतून महापालिकेला २१७५ कोटी रुपये एवढा महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे.