Sunday, June 7, 2026

Maharashtra CM : स्फोटक उद्योग अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडे सुधारणा प्रस्ताव!

Maharashtra CM : स्फोटक उद्योग अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडे सुधारणा प्रस्ताव!

 मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे 'स्फोटके नियम 2008' मध्ये सुधारणा सुचविणाऱ्या प्रस्तावासंदर्भात बैठक पार पडली. स्फोटक कंपन्यांमधील अपघात टाळण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करणार.

"> " class="section-post-content-internal-post-title">Narendra Modi : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आर्थिक विकासाचा वेग ...

नागपूर जिल्ह्यात मागील अडीच वर्षांत स्फोटक कंपन्यांमध्ये झालेल्या अपघातांमुळे झालेली जीवितहानी लक्षात घेऊन 'स्फोटके नियम, 2008' मध्ये सुधारणा सुचविणारा प्रस्ताव राज्य शासन केंद्र सरकारकडे सादर करणार आहे. या प्रस्तावाच्या मसुद्यात जीवितहानी टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये स्वयंचलित प्रक्रियेसह सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा अवलंब करण्याच्या शिफारसी सुचविण्यात आल्या आहेत.

"> " class="section-post-content-internal-post-title">Narendra Modi : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आर्थिक विकासाचा वेग ...

अभ्यासगटाने प्रस्तावाच्या मसुद्यात अनेक शिफारसी सुचविल्या आहेत. त्यात प्रामुख्याने स्फोटकांच्या निर्मिती प्रक्रियेतील जोखीम कमी करण्यासाठी ती जास्तीत जास्त प्रमाणात स्वयंचलित करण्यात यावी व त्यासाठी रोबोट्सचा वापर करावा, प्रत्यक्ष जोखमीच्या प्रक्रियेच्या जागी कमीतकमी मनुष्यबळ उपस्थित राहील, हे सुनिश्चित करावे, तसेच त्यासाठी सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा आधार घेण्यात यावा, या प्रमुख शिफारसींचा समावेश आहे. या शिफारसींना अनुसरून स्फोटके नियम 2008 मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या जाणार आहेत.

Comments
Add Comment