मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या मुलीचे लग्न मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडले. या लग्न सोहळ्याला राजकीय जगतातील बड्या नेत्यांनी सहभाग घेतला होता. अरुण गवळी यांची धाकटी मुलगी अस्मिता गवळी हिचे लग्न झाले. करण असे जावयाचे नाव असून तो भाजीचा व्यवसाय करतो.
मुंबईतील रेडिओ क्लबमध्ये लग्न आणि सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या लग्नाला महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील या लग्नाला उपस्थित राहिले होते.