मुंबई : मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका हायप्रोफाईल कॉन्सर्टदरम्यान २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात आणि तरुणाईमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आयोजकांविरोधात चौकशी सुरू केली आहे. ताडदेव पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (ADR क्रमांक 17/2026) करण्यात आली असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. (Eknath Shinde)
याच कार्यक्रमादरम्यान आणखी एका ३१ वर्षीय महिलेची प्रकृतीही बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रज्ञान रे असे तिचे नाव असून तिला उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या उपचारांनंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिस चौकशीत तिने कार्यक्रमादरम्यान मद्य आणि एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्याचे सांगितले आहे. मात्र, अंमली पदार्थांच्या सेवनासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Eknath Shinde)
मुंबईतील वरळी (Worli) परिसरातील NSCI डोम येथे आयोजित करण्यात आलेल्या एका लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान एका व्यक्तीचा अचानक मृत्यू (Death) झाल्याची ...
मृत्यू झालेला वृषभ गांगुर्डे हा कायद्याचे शिक्षण घेत होता. त्याने कोलकात्यातून वकिलीचे शिक्षण घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कॉन्सर्टचे आयोजन ‘स्पेसबाउंड’ या कंपनीने केले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रत्येक व्यक्तीकडून सुमारे ४ हजार रुपयांचे तिकीट आकारण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमातील सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Eknath Shinde)
दरम्यान, पोलिसांनी कार्यक्रमस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू केली आहे. आयोजक कंपनीतील संबंधित सदस्यांचीही चौकशी केली जात असून मृत्यूमागील खरे कारण समोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Eknath Shinde)
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. “या घटनेची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. तपासात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,” असे शिंदे यांनी सांगितले. तसेच यापूर्वी गोरेगावमधील प्रकरणातही पोलिसांनी सखोल तपास करून कारवाई केल्याचे त्यांनी नमूद केले. (Eknath Shinde)
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी पुन्हा एकदा तेहरान दौऱ्यावर पोहोचले आहेत. फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा संदेश ...






