पालघर : मुंबई-गुजरात महामार्गावरून जात असताना गॅस टँकर उलटला. चालकाचे नियंत्रण सुटले आणि गॅस टँकर खोल खड्ड्यात उलटला. अपघात झाला आणि टँकरमधून कार्बन डायऑक्साइड (CO2) वायूची गळती झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि रसायन तज्ज्ञ यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू केले.वायू वेगाने हवेत पसरत होता त्यामुळे महामार्गावर सुरू असलेली वाहतूक ठप्प झाली.
ही घटना आज म्हणजेच रविवारी (७ जून २०२६) सकाळी दहाच्या सुमारास झाली. याआधी काही दिवसांपूर्वी मुंबईतील गजबजलेले ठिकाण दादर या परिसरात देखील गॅस पाइपलाइनची गळती झाली होती. प्रशासनाने काही काळासाठी दादरचा एक मोठा परिसर सील केला होता. तातडीने उपाय केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

मुंबई : मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका हायप्रोफाईल कॉन्सर्टदरम्यान २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक ...
दादर (पश्चिम) येथील गोखले रोडवरील अनुग्रह हॉटेलजवळ महानगर गॅस लिमिटेडच्या (MGL) पाइपलाइनमधून सायंकाळी सहाच्या सुमारास गळती झाली होती. मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महानगर गॅस लिमिटेडची पथके घटनास्थळी पोहोचली.दुरुस्तीच्या कामासाठी MGL ने बाधित परिसरातील गॅस पुरवठा तात्पुरता बंद केला. वेळेत उपाय करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.





