मुंबई : गूगल इंडियाने मुंबईतील बीकेसीमध्ये ३०४ कोटी रुपयांमध्ये पाच वर्षांसाठी जागा भाड्याने घेण्याचा करार केला आहे. स्क्वायरयार्ड्सने गूगल इंडिया प्राइव्हेट लिमिटेड आणि गूगल क्लाउड इंडिया प्राइव्हेट लिमिटेडच्या कार्यालयांचे नूतनीकरण करून मुंबईतील गूगल कार्यालयाची जागा बदलणार नाही, ते वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये असणार असे सांगितले.
महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने बीकेसीवर भर दिल्यानंतर गूगलने कार्यालयची जागा न बदलण्याचा निर्णय घेतला. पुढील पाच वर्षांसाठी गूगलने बीकेसीमधील कार्यालयाचे कराराचे नूतनीकरण केले आहे.