Puja Khedkar : पूजा खेडकरला १७ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम

  70

नवी दिल्ली  : भारतीय प्रशासकीय सेवेतील बडतर्फ माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयाने १७ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला खेडकरने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने यावर उत्तर दाखल करण्यास दिल्ली पोलिसांना अतिरिक्त वेळ दिला आहे.



पूजा खेडकरला जानेवारीमध्ये झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने १४ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. आता ते १७ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहे. खेडकर हिच्यावर संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा (यूपीएससी) उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.


अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी दोन आठवड्याचा वेळ मागितला. त्यानंतर खेडकरच्या वकिलाने अटकेपासून संरक्षण वाढवून देण्याची विनंती केली.

Comments
Add Comment

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.