Saturday, March 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजअटल सेतू शनिवारी रात्री ११ पासून रविवारी दुपारी १ पर्यंत बंद राहणार

अटल सेतू शनिवारी रात्री ११ पासून रविवारी दुपारी १ पर्यंत बंद राहणार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (एमएमआरडीए) रविवार १६ फेब्रुवारी २०२५ रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सुलभतेने व्हावे आणि गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे व्हावे यासाठी वाहतूक पोलिसांनी अटल सेतूवर (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) वाहतूक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅरेथॉन मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले या भागात पहाटे चार वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी अटल सेतू शनिवार १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजल्यापासून रविवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात अटल सेतूवर दोन्ही दिशांची वाहतूक बंद राहणार आहे.

CIDCO Lottery : सिडकोच्या घरांसाठी आज सोडत

सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग आणि अतिरिक्त पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग, नवी मुंबई, विठ्ठल कुबडे यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५ आणि ११६ (१) (अ) (ब) अंतर्गत वाहतूक निर्बंध लागू करणारा आदेश काढला आहे. निर्बंधांनुसार, मॅरेथॉनसाठी आवश्यक असलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना अटल सेतूवर प्रवेशबंदी असेल. प्रामुख्याने मुंबई, पुणे, उरण आणि जेएनपीटी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उरणहून येणारे गव्हाण फाटा, उरण फाटा आणि वाशी मार्गे प्रवास करू शकतील. पुणे-मुंबई वाहतुकीसाठी यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे बेलापूर आणि वाशी मार्गे उपलब्ध असेल. कोकण आणि पनवेलहून येणारी वाहने देखील उरण फाटा आणि वाशी मार्गे प्रवास करू शकतील, असे वाहतूक विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

Mahakumbhmela : पश्चिम रेल्वेकडून महाकुंभमेळ्यास २ विशेष गाड्या चालवणार

पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवा तसेच मॅरेथॉनमध्ये थेट सहभागी असलेल्या वाहनांना अटल सेतूवरील निर्बंधांतून सवलत देण्यात आली आहे. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे आणि गैरसोय टाळावी; असेही आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -