मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि महाकुंभ मेळा २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी सामावून घेण्यासाठी, पश्चिम रेल्वेने वलसाड-दानापूर आणि साबरमती-बनारस दरम्यान विशेष भाड्यावर दोन जोड्या महाकुंभ मेळा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार असणार आहे. विशेष गाडी क्रमांक ०९०१९ वलसाड-दानापूर महाकुंभ मेळा विशेष गाडी रविवार २३ फेब्रुवारी २०२५ रोजी वलसाड येथून ०८:४० वाजता सुटेल आणि दानापूरला दुसऱ्या दिवशी १८:०० वाजता पोहोचेल.
Mumbai News : सीएसएमटीसह चर्चगेट, मेट्रोजवळील भुयारी मार्ग चकाचक होणार
त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०९०२० दानापूर – वलसाड महाकुंभ मेळा विशेष सोमवार, २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दानापूर येथून २३:३० वाजता सुटेल आणि बुधवारी वलसाड येथे ९:३० वाजता पोहोचेल. ही गाडी नवसारी, भेस्तान, नंदुरबार, अमळनेर, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, चुनार, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आराह स्थानकावर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी २-टायर, एसी ३-टायर, स्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.