Monday, March 24, 2025
Homeब्रेकिंग न्यूज'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'जेएनयू'पेक्षाही डावे...'

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘जेएनयू’पेक्षाही डावे…’

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) जेएनयूपेक्षाही डाव्या विचारांचे असल्याचे जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या. वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी हे वक्तव्य केले.

पिसाळलेला कुत्रा चावल्याने सहा वर्षांची बालिका गंभीर जखमी

‘मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) काम केले आहे. तिथे शिकल्यावर तर कुठेही राजकारण करता येईल. त्या जोरावरच मी ‘जेएनयू’मध्ये चांगले काम करू शकत आहे; असेही डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या.

Mumbai Breaking News : RBI कडून मुंबईतील बँकेला मोठा धक्का!

‘जेएनयू’मध्ये आतापर्यंत एकही महिला कुलगुरू झाली नव्हती. ही परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने बदलली आहे. ते नारीशक्तीविषयी जे बोलले ते त्यांनी करुन दाखवले. ‘जेएनयू’ने आयआयटी आणि आयआयएमला मागे टाकले आहे; असेही डॉ. शांतिश्री पंडीत यांनी सांगितले.

Shirdi News : पुढील चार दिवस रात्री अकरा नंतर शिर्डी बंद!

डाव्या विचारांच्या अभ्यासकांनी भारतात प्रामुख्याने डाव्या विचारांचे स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक होते असेच सांगितले. डाव्यांनी वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा थोरांचे कतृत्व झळाळून लोकांपुढे येऊ नये याची जास्त खबरदारी घेतली. आता या महान व्यक्तिमत्वांची महती आपल्याला जनतेला सांगावीच लागेल, असे डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या.

26/11चा आरोपी तहव्वूर राणाचे अमेरिकेकडून भारताकडे हस्तांतरण होणार

काँग्रेस ज्या सावरकरांचा अपमान करते त्या सावरकरांसारखे आयुष्य काँग्रेसचे किती नेते आजवर जगले आहेत ? इंग्रजांच्या काळातही काँग्रेसच्या ठराविक नेत्यांना कायम व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली आहे, असे डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या. हिंदू बहुसंख्यांक असतील तरच या देशात धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही व्यवस्था राहील; असा विश्वास डॉ. शांतिश्री पंडीत यांनी व्यक्त केला.

बीकेसी-कुलाबा मेट्रोचा ‘टप्पा २ अ’ मार्च अखेर खुला

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -