धुळे : धुळे शहरात भटक्या कुत्र्यांनी दहशत पसरवली आहे. नागरिकांना रस्त्याने जाणे – येणे कठीण झाले आहे. या कुत्र्यांचा पालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. धुळे शहरातील नगावबारी परिसरात भटका कुत्रा सहा वर्षांचा मुलीला चावला. कुत्र्याच्या चाव्यामुळे सहा वर्षांची बालिका गंभीर जखमी झाली आहे. जखमी झालेल्या मुलीला तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीवर उपचार सुरू आहेत. पण ताज्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांविषयी लोकांच्या मनात भीती वाढली आहे. तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी स्थानिकांकडून वारंवार होऊ लागली आहे. नागरिकांना दुखापत झाल्याच्या घटना वारंवार समोर येऊन देखील महापालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
पिसाळलेला कुत्रा चावल्याने सहा वर्षांची बालिका गंभीर जखमी
