मुंबई : मुंबईतल्या बँकेला RBI ने मोठा धक्का दिल्याची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहे. आरबीआयच्या या निर्बंधानंतर, बँक ठेवीदारांना त्यांच्या खात्यात जमा केलेले त्यांचे कष्टाचे पैसे काढता येणार नाहीत. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक आता कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणतीही ठेव घेऊ शकणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या बँकेत अनियमितता वाढल्याने पुढील सहा महिन्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहे. गुरुवार दि १३ फेब्रुवारीपासून आरबीआयच्या या कडक कारवाईनंतर, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक ग्राहकांना कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा ग्राहकांकडून ठेवी स्वीकारू शकणार नाही. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँक ठेवीदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. बँक खातेधारकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. या सहा महिन्यांच्या कालावधीत बँकेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. सहा महिन्यांनंतर, आरबीआय बंदीच्या निर्णयाचा आढावा घेईल.
RBI काय म्हणाली ?
बँकेची सध्याची रोख स्थिती पाहता, ठेवीदाराच्या बचत बँक किंवा चालू खात्यातून किंवा इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तथापि, बँकेला बँक कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे आणि वीज बिल यासारख्या काही आवश्यक गोष्टींवर खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे.