मुंबई : काही दिवसांपूर्वीच एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर रिक्षा-टॅक्सीचीदेखील भाडेवाढ करण्यात आली. यामुळे प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागत आहे. अशातच आता स्कूल बसच्या शुल्कातही वाढ होणार आहे. (School Bus Fares Hike) त्यामुळे ऐन महागाईत पालकांच्या खिशाला कत्री बसणार आहे.
Reliance Jio: वर्षभर रिचार्जचे नो टेन्शन, हा आहे Jioचा वार्षिक प्लान
मिळालेल्या माहितीनुसार, चांगली सेवा आणि सुरक्षितता नियमांचे पालन करण्यासाठी चालक, महिला मदतनीस आणि व्यवस्थापकांना पगारवाढ द्यावी लागते. शिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. पार्किंग शुल्क दुप्पट झाले आहे. आरटीओचा दंड वाढल्याने खर्चात आणखी भर पडली आहे. या वाढत्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’ने (एसबीओए) मुंबईसह राज्यात १८ टक्के दरवाढ करण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्यात शालेय बसव्यतिरिक्त रिक्षा, टॅक्सींमधूनही विद्यार्थी वाहतूक केली जाते. ही वाहतूक बेकायदा आहे. राज्य सरकारने बेकायदा विद्यार्थी वाहतुकीला आळा घातल्यास दरवाढ रद्द करण्यात येईल, असे एसबीओएचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. (School Bus Fares Hike)