सिंधुदुर्ग : केर गावात सकाळी पाच हत्तींच्या कळपाने धुडगूस घातला. शेतकरी चंद्रकांत देसाई यांच्या मालकीच्या केळी सुपारी आदी सह अन्य झाडांची मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. केर गावातच हत्तींनी ठाण मांडले असल्याने ऐन हंगामात काजू बाग बहरत असताना शेती बागायती फिरणे मुश्किल झाले आहे.आसपास जंगलात जाणेही शक्य होत नाही त्यामुळें जळणासाठी लागणारे सरण (लाकडे) कसे आणावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ना पिक, ना उत्पन्न, अशी अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे.
जीवापाड मेहनत करून वाढविलेली बागायती पिके हत्तींनी उध्वस्त करून लाखो रुपयांची नुकसानी केली आहे. ग्रामीण भागातील उदरनिर्वाह हा काजू,आंबा, सुपारी नारळ,केळी आदींवर अवलंबून असतो. मात्र तेच उत्पन्न हातातोंडाशी आले असताना घास हिरावून घेतला जात आहे. या संकटावर उपाय करण्यासाठी वन विभागाने सक्रीय व्हावे, हत्ती पकडून घनदाट जंगलात रवाना करावे, हत्तींचा योग्य पद्धतीने बंदोबस्त करावा; अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.