Sunday, February 9, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणआंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठक

आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठक

सिंधुदुर्ग : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, स्वच्छतेला प्राधान्य देऊन आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी सोपविलेली कामांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मालवण तालुक्‍यातील आंगणेवाडी येथील भराडी देवी वार्षिक जत्रौत्‍सव आणि देवगड तालुक्‍यातील कुणकेश्वर देव स्वयंभू देवाचा वार्षिक जत्रौत्‍सव नियोजनाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

Nitesh Rane : सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाला तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध; पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

जिल्हाधिकारी म्हणाले, यात्रेदरम्यान भाविकांना सर्व सुविधा मिळणे आवश्यक आहे. यात्राकाळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. मंदिर परिसरापासून किती अंतरावर स्टॉल व दुकाने ठेवण्यात येणार आहेत तसेच किती स्टॉल उभारले जाणार आहे याबाबत तपशील ग्रामपंचायत विभागास पुरवावा. एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन ठराविक अंतर निश्चित करुन दुकानांना परवानगी देण्यात यावी. भाविकांना सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले.

‘सोनवडे आणि आंजीवडे घाटमार्गांचे काम लवकर सुरू करा’

यात्रेदरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडण्याबाबत रेल्वे विभागाशी चर्चा करणार. यात्रेदरम्यान एसटी महामंडळाने जादा बसेस सोडाव्यात. पार्कींग व्यवस्था मंदिरापासून दूर करावी जेणेकरुन गर्दी होणार नाही. जत्रेपूर्वी दोन दिवस व जत्रेनंतर दोन दिवसांनी मंदिर परिसर स्वच्छ करण्याकरिता स्वच्छता मोहिमांचे आयोजन करावे, मंदिर परिसरापासून किती अंतरावर स्‍टॉल व दुकाने उभारले जाणार आहेत हे नियोजन करावे, प्रत्येक स्‍टॉलवर अग्निरोधक यंत्रणा (पाण्याची सोय, वाळूच्या बादल्या ) बसवून घेण्‍यात यावेत असेही ते म्हणाले.

सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री नितेश राणेंचा न्याय दरबार

कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना श्री अग्रवाल म्हणाले , महत्वाच्या ठिकाणी पोलीस चौक्‍या उभाराव्यात, वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे, देवस्‍थान परिसर, मंदिराचे मार्गाची तपासणी करावी, वाहतूक नियंत्रण व नियमन करावे, मंदिर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू ठेवावीत, त्यामध्ये पुरेशा प्रमाणात प्राणवायू, जीवरक्षक औषधे व सुविधा असलेल्‍या रुग्‍णवाहिका वैद्यकिय पथकाकडून सुसज्ज ठेवाव्यात, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय पथक, अतिरिक्त डॉक्टर, बेड रुग्णवाहिका यांची व्यवस्था करावी असेही ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -