पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मार्कंडे हे आपल्या कुटुंबासह कारने मुंबई-गोवा महामार्गावरून दापोलीकडे जात होते. त्यांच्या कारची रस्त्याच्या कडेला उभ्या कंटेनरला जोराची धडक बसली. धडक एवढी जोराची होती की कारचा चेंदामेंदा झाला.
Crime News : नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. घरकामासाठी नोकरीवर ठेवलेल्या जोडप्याने मालकिणीचा विश्वासघात केला. कपाटातील तब्बल ...
या अपघातात सुवर्णा मार्कंडे आणि अनुशी अनिल मार्कंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल मार्कंडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणखी एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. जखमींना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीर जखमी अनिल मार्कंडे यांना पुढील उपचारांसाठी माणगाव येथे नेण्यात आले आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः महामार्गावर उभ्या असलेल्या जड वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याची चर्चा होत आहे. या दुर्घटनेमुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.





