Mumbai News : मुंबई हादरली! दादर स्टेशनला उभ्या असलेल्या गाडीत आढळला मृतदेह

मुंबई : मुंबईच्या दादर परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दादर स्टेशनला उभ्या असलेल्या लांब पल्ल्याच्या गाडीत मृतदेह आढळला आहे. ही घटना रणकपूर एक्स्प्रेसमध्ये घडली आहे. ही एक्स्प्रेस राजस्थानमधून दादरला रवाना होते. या घटनेने दादर परिसर हादरून गेला आहे.



दादर स्थानकात उभ्या असलेल्या लांब पल्ल्याच्या रणकपूर एक्स्प्रेसच्या टॉयलेट मध्ये एक बेवारस मृतदेह आढळला. या व्यक्तीने टॉवेलच्या सहाय्याने गळा आवळून आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. रणकपूर एक्स्प्रेस दादर स्टेशनवर उभी असताना आरपीएफकडून रेल्वेची तपासणी करण्यात आली. बराच वेळ टॉयलेटचा दरवाजा न उघडल्याने आरपीएफ जवानांनी एक्स्प्रेसच्या डब्ब्यातील टॉयलेटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.शेवटी दरवाजा तोडण्यात आला. यानंतर चक्क टॉयलेटमध्ये मृतदेह दिसला.



पोलीस या व्यक्तीबद्दल अधिकचा तपास करत असून या मृतदेहाच्या आजूबाजूला अद्यापही ओळखपटण्याजोगे कोणतेही पुरावे सापडले नाही आहेत.

Comments
Add Comment

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ