कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत घोटगे-शिवडाव-सोनवडे घाटमार्गाच काम लवकरात लवकर सुरू व्हावे या बाबत सकारात्मक चर्चा झाली. सोबतच प्रस्तावित आंजीवडे घाटमार्गाचा डीपीआर बनविण्याची कार्यवाही करण्याबाबतही चर्चा झाली. आमदार निलेश राणे यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांची आज मुंबई येथे भेट घेतली. यावेळी कुडाळ तालुक्यातील जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घोटगे सोनवडे शिवडाव या घाटमार्गाचे काम सुरू करण्यासंदर्भात व माणगाव खोऱ्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण अश्या आंजिवडे… pic.twitter.com/wZ6XAiGSaf
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 29, 2025
पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे. यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी, अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली.