Saturday, February 8, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNitesh Rane : सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाला तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध; पालकमंत्री नितेश राणे...

Nitesh Rane : सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाला तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध; पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. तसेच या महाविद्यालयातून गोवा येथे रुग्ण पाठवण्याची पद्धत तात्काळ बंद करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मंत्री हसन मुश्रीफ, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे सहा महिन्यात भरण्याच्या सूचना देऊन मंत्री मुश्रिफ म्हणाले की, वर्ग तीन आणि वर्ग चारची पदे तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास परवानगी दिली. ही पदभरती पारदर्शक व्हावी याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. ही सर्व पदे येत्या ८ महिन्यात भरावीत. तसेच ज्या ठिकाणी जादा पदे आहेत तेथील प्राध्यापक वर्गाची सेवा सिंधुदुर्ग येथे देण्याची व्यवस्था करावी. नर्सिंग महाविद्यालयाची वसतीगृहाची इमारत पाडण्यास आरोग्य विभागाने परवानगी द्यावी, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी भाडेतत्वावर जागा घ्यावी, विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी आणि करावयाच्या सुधारणा आणि पुरवावयाच्या सोयी यांची माहिती द्यावी, नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

India’s AI Model : भारत स्वतःचे जनरेटिव्ह-एआय मॉडेल बनवणार

यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयास साधनसामुग्री पुरवण्याविषयी सूचना दिल्या. तसेच वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची भरती पारदर्शी होण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी नियोजन करण्यात यावे, औषधांसाठी लागणारा निधी देण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जादाची १३ एकर जमीन देण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी कौशल्य विकास विभागाकडील आयटीआयची ३ एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच समाजिक वनीकरण विभागाकडील १० एकर जागेसाठी पाठपुरावा करावा, मंत्रिमंडळासमोर लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून येत्या मे महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील. तर वर्ग तीन, वर्ग चार आणि तांत्रिक, अतांत्रिक पदे येत्या ८ महिन्यात भरली जातील अशी माहिती आयुक्त निवतकर यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -