Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीRepublic Day 2025 : प्रजासत्ताक दिन परेडमध्ये इंडोनेशियन पथकाचा समावेश

Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिन परेडमध्ये इंडोनेशियन पथकाचा समावेश

भारतीय पथसंचलनात प्रथमच विदेशी पथकाचा सहभाग

नवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे भारतात दाखल झालेत. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये इंडोनेशियन ‘मार्चिंग आणि बँड पथक’ सहभागी होणार आहे. भारतीय परेडमध्ये परदेशी पथक दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली.

यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार इंडोनेशियातील १६२ सदस्यांचा मार्चिंग दल आणि १९० सदस्यांचा बँड प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा भाग असेल. दुसऱ्या देशाच्या राष्ट्रीय परेडमध्ये इंडोनेशियन पथक सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे दोन्ही देशांमधील मजबूत लष्करी आणि सांस्कृतिक सहकार्याचे प्रतीक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात सहभागी होणारे सुबियांतो हे चौथे इंडोनेशियन राष्ट्रपती असतील. इंडोनेशियाचे अध्यक्ष सुबियांतो यांच्या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमधील अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला उपस्थित राहणारे ते चौथे इंडोनेशियन राष्ट्रपती असतील. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात १९५० मध्ये इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो प्रमुख पाहुणे होते.

Nitesh Rane : मशिदींवरील भोंगे वाजताना कायद्याची पायमल्ली झाली तर कडक कारवाई करणार

गेल्या काही वर्षांत भारत-इंडोनेशिया संबंध वाढले आहेत. पंतप्रधान मोदींनी २०१८ मध्ये इंडोनेशियाला भेट दिली होती. त्या काळात भारत-इंडोनेशिया संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत पोहोचले. प्रबोवो सुबियांतो यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही चर्चा केली आहे. इंडोनेशियामध्ये राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर सुबियांतो यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला होता. या काळात, भारत आणि इंडोनेशियामधील संस्कृती संबंध पुढे नेण्यावर आणि राजनैतिक संबंध मजबूत करण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. याशिवाय, २०२४ मध्ये ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यानही दोन्ही नेत्यांची भेट झाली होती

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -