कोल्हापूर : कोल्हापूरमधील दख्खनचा राजा जोतिबाच्या (Jyotiba Temple) चैत्र यात्रेत दोन टन खराब पेढे खवा सापडला होता. त्यामुळे सर्व परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाने यात्रा काळात काही दुकानदारांवर कारवाई केली होती. मात्र आता पुन्हा जोतिबाच्या दारी भाविकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जोतिबाच्या डोंगरावर असणाऱ्या मिठाईच्या दुकानात प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेड आढळल्याचे समोर आले आहे.
Amit Shah : गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी करणार नाशिक दौरा; घेणार त्र्यंबकराजाचे दर्शन!
जोतिबाच्या डोंगरावर मेवा मिठाईच्या दुकानात खव्याच्या बर्फीत ब्लेडचा अर्धा तुकडा आढळला आहे. याप्रकारामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाविकांकडून या प्रकरणी संताप व्यक्त होत असताना संबंधीतांवर जिल्हा प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पेढे, खवा बर्फी या पदार्थांवर कोणतीही एक्सपार तारीख व उत्पादन तारीख दिसत नाही. मोठ-मोठी भांडी भरून हा खवा पंढरपूर-सोलापूर, तसेच परराज्यातून डोंगरावर येतो. त्यामुळे पूर्ण भांडे संपेपर्यंत महिना दीड महिना ही मेवा मिठाई विकली जाते. ही मिठाई खाल्यामुळे भाविकांच्या आरोग्यास धोका आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे नवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.