नाशिक : गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) हे शुक्रवारी २४ जानेवारी रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते त्र्यंबकराजाचे दर्शन घेणार असून त्यांची सहकार परिषद देखील आयोजित करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ यात्रेच्या कालावधीत शहांचा हा दौरा होणार असल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
Mumbai Water Cut : पवईत पाणी गळती; ‘या’ ४ विभागात पाणी पुरवठा बंद!
गृहमंत्री अमित शाह यांचे शुक्रवारी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी विमानतळावर आगमन होणार असून बीएसएफच्या हेलिकॉप्टरने ते त्र्यंचककडे प्रस्थान करणार आहेत. त्त्यानंतर १२ वाजून २० मिनिटांनी त्र्यंबक येथील हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरेल, तेथून ते मोटारीने त्र्यंबके वर मंदिराकडे प्रस्थान करतील. साडेबाराच्या सुमारास त्र्यंबकेश्वर मंदिरात आगमन होणार असून त्याठिकाणी ते त्र्यंबकराजाचे दर्शन, पूजन करणार आहेत. मंदिरातील पूजेसाठी वीस मिनिटांचा कालावधी आरक्षित असणार आहे. त्यानंतर दुपारी एकला ते हलिकोप्टरने मालेगावकडे स्वाना होतील.
दुपारी दोनला गृहमंत्री शाह (Amit Shah) हे मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील वेंकटेश्वरा को ऑपरेटिव्ह फर्मला भेट देणार आहेत. याठिकाणी सहकार परिषद आयोजित करण्यात आली असून त्यानंतर ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेतीनला बीएसएफच्या हेलिकॉप्टरने ते ओझर विमानतळावरून वीएसएफच्या विमानाने मुंबईकडे परततील.