बीड : मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशमुख हत्याकांडातील मास्टर माईंड असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लागला आहे. दरम्यान त्याच्या वकिलांनी केज न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. आज केज न्यायालयात त्याबाबत सुनावणी होणार आहे.
HSC-SSC Result Date : आता जून मध्ये नाही तर ‘या’ महिन्याच्या १५ तारखेपर्यंत १०-१२वी चे निकाल लागणार!
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात आरोपी असलेल्या सगळ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवाब नोंदवण्यात आला आहे. या हत्याकांडातील मकोका लागलेल्या मास्टर माईंड असलेल्या वाल्मिक कराडला मकर संक्रांतीच्या दिवशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच दिवशी त्याच्या वकिलांनी केज न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. आज केज न्यायालयात न्या. एस. व्ही. पावसकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.दरम्यान आता वाल्मिक कराडला जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.