मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्पाच्या टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी बोगदा खनन संयंत्रा (टीबीएम) चे सुटे भाग ‘शाफ्ट’मध्ये जोडण्याचे कामकाज गतीने सुरू आहे. पहिल्या बोगदा खनन संयंत्राच्या जोडणीचे काम जून महिन्याच्या दुस-या आठवड्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तर, दुस-या बोगदा खनन संयंत्राच्या जोडणीचे काम समांतरपणे वेगाने सुरू आहे.
उपमहापौर संजय घाडी यांनी केली कुर्ला भागातील नाल्यांची सफाई मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे हद्दीतील नाल्यांच्या स्वच्छतेसंदर्भात रेल्वे प्रशासन, ...
महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या कामकाजाची आकस्मिक पाहणी केली . पहिल्या बोगदा खणन संयंत्राची संपूर्ण यंत्रणा प्रकल्पस्थळी स्थापित केल्यानंतर तिची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सर्व प्रणालींचे एकत्रित कार्य योग्यरित्या होत आहे की नाही, याची प्रत्यक्ष तपासणीसाठी प्रकल्पस्थळ स्वीकृती चाचणी करण्यात येईल. यात प्रामुख्याने यांत्रिक, विद्युत, हायड्रॉलिक, नियंत्रण व सुरक्षा प्रणालींची तपासणी करण्यात येईल. सर्व चाचण्या निर्धारित निकषांनुसार समाधानकारक आढळल्यावर प्रत्यक्षात बोगदा खोदकामास सुरूवात केली जाईल.
पुणे : नाशिक येथील 'टीसीएस' आणि मुंबईतील 'एसबीआय' बँकिंग क्षेत्रातील वादग्रस्त प्रकरणांनंतर आता पुण्याच्या हिंजवडी येथील 'विप्रो टेक्नॉलॉजीज लिमिटेड' ...
गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड येथे खिंडीपाडा पर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्येकी ४.७० किलोमीटरचे आहेत. या समांतर बोगद्यांचा व्यास १४.२० मीटर तर संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात १३ मीटरचा आहे. निर्धारित वेळापत्रकानुसार दोन्ही बोगद्यांचे खोदकाम सुरू करून ऑक्टोबर २०२८ पूर्वी बोगद्यांचे खोदकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्टय डोळयासमोर ठेवण्यात आले आहे. एकूणच, डिसेंबर २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे, असे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सांगितले.





