नवी मुंबई : सानपाडा सेक्टर दोनमधील परिसरात कॉलेजवयीन युवक-युवतींकडून भर रस्त्यावर सुरु असलेले अश्लिल चाळे बंद करण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याची लेखी मागणी भाजयुमाचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी सानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा सेक्टर दोनमधील रहिवाशी रस्त्यावर खुलेआमपणे चालणाऱ्या कॉलेज युवक युवतींच्या अश्लिल चाळ्यामुळे त्रस्त झाले आहेत. परिसरातील वेस्टर्न कॉलेजमधील विद्यार्थी सेक्टर दोनमधील अंर्तगत भागात वेस्टर्न कॉलेज, ओपीजी टॉवर ते वात्सल्य ट्रस्ट या रस्त्यावर अश्लिल चाळे करताना पहावयास मिळतात. रस्त्याच्या कडेला, झाडांसभोवताली तसेच चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी उभ्या असलेल्या अवजड वाहनांच्या पाठीमागील बाजूस या विद्यार्थी विद्यार्थीनीचे अश्लिल चाळे सुरु असतात.
Kirit Somaiya : ‘पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी’- किरीट सोमय्या
याबाबत रहीवाशांनी या विद्यार्थ्यांना हटकल्यावर रहीवाशांनाच शिवीगाळ करतात, दमदाटी करतात, अंगावर दावून जातात. या रस्त्यावरुन जाताना महिलांना, मुलींना, ज्येष्ठ नागरिकांना माना खाली घालून जावे लागते. या परिसरात पोलीसांची गस्त वाढवावी. जे जे विद्यार्थी अश्लिल चाळे करताना आढळतील त्यांना पोलीस ठाण्यात पकडून आणावे, त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून मुले काय उद्योग करतात, याची माहिती द्यावी. या परिसरात सुरु असणारे अश्लिल चाळे बंद करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्त वाढवण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी सानपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.