पुणे शहरातून बोगस दाखले नसल्याचेही स्पष्टीकरण
पुणे : बांगलादेशी घुसखोरांवरून देशभरात वातावरण तापू लागले आहे. ठिकठिकाणी बांगलादेशी घुसखोर सापडू लागले आहेत. परंतु, प्रशासनाने या घुसखोरांना सर्व प्रकारची प्रमाणपत्रे पुरविल्याने आजही अनेक बांगलादेशी नागरिक बिनदिक्कत राहत आहेत. २०२४ मध्ये किती बांगलादेशींना जन्माचे दाखले देण्यात आले याची आकडेवारी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मांडली आहे. पुणे शहरात कोणालाही बोगस दाखले देण्यात आलेले नाहीत. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी असल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बांगलादेशी अवैध घुसखोरीसंदर्भात निवेदन दिले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. सोमय्या म्हणाले, राज्यात २०२४ मध्ये ६० हजार बांगलादेशींना जन्माचे बोगस दाखले देण्यात आले आहेत. मालेगाव ४५००, अमरावतीत १४५०० एवढे प्रचंड संख्येने दाखले देण्यात आले आहेत. मुंबईत ५८ दाखले देण्यात आले असून पुणे शहरात कोणालाही बोगस दाखले देण्यात आलेले नाहीत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
High Security Number Plate : वाहनांना ३० मार्चपूर्वी ‘हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट अनिवार्य !
२०२३ नोव्हेंबरमध्ये जन्म मृत्यूच्या दाखल्यांचा अधिकार तहसीलदारांना देण्यात आला म्हणून हा गोंधळ झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहेत. त्याची माहिती मी मागविली आहे. ही माहिती मिळताच मी लगेचच एटीएसला ती देणार आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले म्हणून हे बाहेर आले, असे सोमय्या यांनी नमूद केले.
वाल्मीक कराड विषय वेगळा आहे. यात कोणालाही सोडले जाणार नाही. कालपर्यंत सुळे आणि ते सोबत होते. वाल्मीक कराडला नोटीस आली, तेव्हा सरकार त्यांचेच होते. मी कोणाविषयी तक्रार मागे घेतली नाही, असेही कराड यांच्यावरील ईडी नोटीस कारवाईवर सोमय्या यांनी स्पष्ट केले.