Saturday, February 8, 2025
Homeदेश...म्हणून हिंडेनबर्गचे दुकान बंद

…म्हणून हिंडेनबर्गचे दुकान बंद

नवी दिल्ली : अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी रोजी शपथ घेणार आहेत. हा शपथविधी जवळ येताच नॅथन अँडरसन यांनी हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था बंद करत असल्याचे जाहीर केले. हिंडनबर्ग रिसर्च याच संस्थेचे अहवाल दाखवत विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत उद्योगपती गौतम अदानी आणि केंद्र सरकारवर आरोप करत होते. आता ही संस्थाच बंद होत आहे. ज्या हेतूने संस्था सुरू केली होती तो साध्य झाला म्हणून आता संस्था बंद करत आहे, एवढे सांगत नॅथन अँडरसन यांनी हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था बंद करत असल्याचे जाहीर केले. पण नेमका हेतू काय होता हे जाहीर करणे टाळले.

Saif Ali Khan : सैफ अली खानची प्रकृती स्थिर, दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी

आरोग्याशी संबंधित कोणतेही कारण नाही. आर्थिक किंवा इतर कोणतेही कारण नाही. हा एक वैयक्तिक निर्णय आहे. ज्याने संस्था सुरू केली त्याचाच हा निर्णय आहे, अशा स्वरुपाची वाक्यरचना करत सोशल मीडियावर व्यक्त होत नॅथन अँडरसन यांनी हिंडनबर्ग रिसर्च बंद करत असल्याचे जाहीर केले.

Manu Bhaker : मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेली पदके परत करणार; नेमकं कारण काय?

हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था ठरवून निवडक कंपन्यांची बदनामी करते. ही बदनामी करण्यासाठी आर्थिक पाहणी आणि अभ्यास केल्याचे सांगत अहवाल सादर करते; असा आरोप काही अभ्यासक करत होते. शेअर बाजारात ठरवून झटपट नफा कमावण्यासाठी काही जण व्यवहार करतात. या व्यवहारांचे आणि हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालांचा परस्पर संबंध आहे, असाही आरोप काही अभ्यासक करत होते. या आरोपांबाबत काही बोलणे टाळून नॅथन अँडरसन यांनी हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था बंद करत असल्याचे जाहीर केले. आता हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था बंद झाल्यामुळे राहुल गांधी काय करणार, कोणाचे अहवाल आरोप करण्यासाठी आधार म्हणून वापरणार यावरूनही चर्चेला उधाण आले आहे.

Rahul Gandhi Exposed : खरा चेहरा समोर आला!

विचित्र योगायोग

काँग्रेस मुख्यालयाचे कोटला मार्ग येथे स्थलांतर झाले. या नव्या मुख्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राहुल गांधी यांनी केलेले भाषण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आपली लढाई आरएसएस, भाजपा आणि भारताच्या विरोधात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आणि हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था बंद होत असल्याची बातमी आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -