मुंबई : मनू भाकरने (Manu Bhaker) गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) अचूक लक्ष्यभेद करून इतिहास रचला आणि ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली. मात्र आता या दिग्गज नेमबाजाची दोन्ही पदके परत घेतली जाणार आहे. ही पदके अवघ्या ५ महिन्यांत खराब झाली. यामुळे आता ही पदके बनवणारी फ्रेंच कंपनी मोनाई डी पॅरिस मनूला नवीन ब्रँड पदके देणार आहे.
ISRO : भारताची ऐतिहासिक कामगिरी! इस्त्रोने अंतराळात केले २ उपग्रहांचे डॉकिंग
मिळालेल्या माहितीनुसार, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर काही दिवसांतच मनू भाकरच्या पदकांचा रंग उडाला होता आणि या पदकांची अवस्था वाईट झाली होती. त्यामुळे पॅरिसमध्ये जिंकलेल्या दोन कांस्यपदकांच्या जागी मनूला नवीन पदके मिळणार आहे. केवळ मनू भाकरच नाही तर जगभरातील अनेक खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या पदकांबाबत तक्रारी केल्या होत्या. पॅरिस ऑलिम्पिक पदकांचे खराब दर्जाचे फोटो खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या तक्रारींनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हटले आहे की, खराब झालेले ऑलिम्पिक पदक पुन्हा एकदा मोनेई डी पॅरिसकडून दुरुस्त केले जातील आणि ते नवीन बनवून खेळाडूंना परत केले जातील.
पॅरिस ऑलिम्पिक आयोजन समितीने हे पदक बनवण्याचा ठेका मोनाई डी पॅरिसला दिला होता. ही एक सरकारी मालकीची कंपनी आहे जी फ्रान्ससाठी नाणी आणि इतर चलन देखील तयार करते. अहवालानुसार, कंपनी येत्या आठवड्यात खेळाडूंची खराब झालेली सर्व पदके बदलून देईल. फ्रेंच कंपनी मोनाई डी पॅरिसने प्रत्येक पदकात आयफेल टॉवरमधील लोखंडाचे तुकडे वापरले. या कंपनीने ऑलिम्पिक खेळांसाठी ५,०८४ सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली होती.
मनू भाकर स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिलीच महिला आहे. वैयक्तिक १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकून तिने ऑलिम्पिक पदक जिंकणारी देशाची पहिली नेमबाज बनून खेळांमध्ये भारताचे पदक खाते उघडले. २२ वर्षीय मनू भाकरने त्यानंतर सरबज्योत सिंगसोबत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक कांस्यपदक जिंकले.